अखेर पिक विम्यासाठी वगळलेले मंडळे पात्र, या जिल्ह्याचा संपूर्ण पिक विमा मंजूर..! pik vima

शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर घेऊन येत आहोत. मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक महसूल मंडळे 25 टक्के पिक विमा विम्यातून वगळली गेली होती.

म्हणजे त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचा लाभ होणार नव्हता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन काढलेल्या अधिसूचनेनुसार आता सोलापूर जिल्ह्यातील वगळलेल्या सोयाबीन, कापूस, मका, तूर अशा विविध पिकांसाठी 36 महसूल मंडळ समावेश करून जिल्हाधिकाऱ्याद्वारे एक नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम विमा वाटप सुरू Advance insurance

या आधी सूचनेनुसार आता सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळे 25 टक्के पिक विमा साठी पात्र करण्यात आली आहेत.5 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कापूस, सोयाबीन, बाजरी, कांदा, भुईमूग या पिकांचा समावेश करून 25 टक्के पिक विमा जाहीर करण्यात आला होता. मात्र यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बरेच महसूल मंडळे वगळण्यात आली होती.

यामुळे तेथील स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा करण्यात आला. व तसेच बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल काही निवेदन देखील देण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे म्हणजेच जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून या अपात्र असलेल्या महसूल मंडळांचे सर्वेक्षण करण्याची निर्देश देण्यात आले होते.

हे वाचा: अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 11 जिल्हे पात्र..! पहा जिल्हानिहाय यादी Flood Damage Compensation

आणि आता याच पार्श्वभूमीवरती आठ ऑक्टोबर 2023 रोजी नवीन अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून. या 36 महसूल मंडळांचा 25% पिक विम्यासाठी समावेश करण्यात आला आहे.

तसेच या महसूल मंडळाचे सर्वेशन करताना या महसूल मंडळामध्ये तब्बल 80 ते 85% नुकसान दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता सहाजिकच वरील 36 महसूल मंडळांना आता अधिकचा 25 टक्के पिक विमा मिळू शकतो.

जिल्ह्यातील पात्र असलेली 36 महसूल मंडळांची नावे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता

हे वाचा: अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर..! पुणे नाशिक सह या जिल्ह्यांचा समावेश पहा तालुकानिहाय यादी..Drought declared

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment