अखेर या तालुक्यांना मिळणार सततच्या पावसाचे अनुदान..!

नमस्कार शेतकरी मित्रांनो सन 2022 या कालावधीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात सततचा पाऊस ,अतिवृष्टीमुळे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं. ते नुकसान भरून.

काढण्यासाठी 20 जून 2023 बुलढाणा जिल्ह्यातील एकूण दोन लाख 68 हजार 363 शेतकऱ्यांसाठी 114 कोटी 90 लाख रुपये वितरणाचा निधी मंजूर करण्यात आला होता.

हे वाचा: राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नुकसान भरपाई

परंतु या निधीचा वाटप होत असताना. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जाणोदा व नांदुरा या गावांचा यामध्ये समावेश केला नव्हता. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या गावांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी मोठे आंदोलन बुलढाणा येथे उभारण्यात आले होते.

जिल्हाअधिकाऱ्यांच्या मार्फत 25 ऑगस्ट 2023 रोजी राज्यशासनाला जळगाव जाणोदा व नांदुरा तालुक्यातील एकूण 27 हजार 918 शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी पत्र देण्यात आले होते.

आणि आज पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा समावेश करून घेतला. व या शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 87 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यासंदर्भात चार सप्टेंबर रोजी जीआर निघाला आहे.

हे वाचा: पाऊस न पडल्यास पिक विमा नाही..!

Leave a Comment