शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पुढील चार-पाच दिवसात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

यावर्षीचा ऑगस्ट महिना 150 वर्षातील‌ सार्वधिक कोरडा महिना राहिला. ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 27 ते 28 दिवस पावसाचा खंड राहिला. राज्यातील शेतकरी देवासारखी पावसाची वाट पाहत आहेत.

हे वाचा: राज्यात आज पासून पुढचे इतके दिवस असणार पावसाची उघडीप..! पहा पंजाबराव डख काय म्हणतात पावसाबद्दल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या सभेत दुष्काळा परिस्थितीवर भाष्य झाले. पुढील चार ते पाच दिवसात राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, आणि विदर्भ या भागातील जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे येत्या 48 तासात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमधील टोमॅटो बाजारभाव फक्त एका क्लिकवर

Leave a Comment