शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पी एम किसान योजनेचे मिळणार आता 8000 रुपये

Pm kissan Yojana: आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीवर केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना गुड न्यूज देण्याच्या मार्गावर आहे. पी एम किसान ( PM kissan Yojana) या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे संकेत केंद्र शासनाद्वारे दिले जात आहेत.

केंद्र सरकार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना या योजनेची रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपयांवर नेण्याच्या मार्गावर आहे. येत्या आगामी काळात देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. त्याआधी या विषयावर निर्णय निघण्याची दाट शक्यता आहे.

हे वाचा: या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून सोयाबीनचा पिक विमा जमा होण्यास सुरुवात Soybean crop insurance

CNBC-tv18 ने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून वरील योजना अंतर्गत 10000 कोटी रुपयांची बचत केली आहे. या योजनेचा बोगस फायदा घेत असलेल्या नागरिकांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे ही बचत झाली आहे.

देशातील तब्बल 1.72 कोटी अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून काढून टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 10000 कोटी रुपयांची बचत करणे शक्य झाले.

वरील बचत पाहता केंद्र सरकार पी एम किसान सन्माननीय योजनेचा निधी देखील वाढवू शकतो. अशी माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आहे.

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार नुकसान भरपाई; Dushkal Anudan Yojana

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये रक्कम पात्र शेतकऱ्याला मिळते. या योजनेचे पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 14 हप्ते वितरित करण्यात आले असून. पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

Leave a Comment