सरसकट पीक विम्याची रक्कम या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..! तारीख जाहीर Pik vima

गेल्या अनेक दिवसापासून पिक विमा प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. अखेर तारीख जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांचा सरसकट पिक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील तब्बल 1.25 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. 2023 हंगामात राज्यातील तब्बल 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता.

हे वाचा: 25% पिक विमा या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तारीख जाहीर

राज्य सरकार द्वारे यावर्षी फक्त एक रुपयात पिक विमा योजना देखील राबवली गेली होती. त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली. राज्यात यावर्षी सुरुवातीच्या काळापासूनच पावसाने मंद गती धरली आहे.

परंतु काही भागात चांगला पाऊस पडत असून. काही भागातले शेतकरी अजून सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके जळू लागली आहेत.

शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. अशातच पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दीलासा मिळणार आहे. व फायदा देखील होणार आहे.

हे वाचा: तुमची ई पिक पाहणी नोंदणी पूर्ण झाली का..? असे तपासा व पहा तुमच्या गावातील यादी

यावर्षी राज्यामध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया पिक विमा भरला आहे. अशा सर्वच शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसाअभावी नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा भरला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

राज्यातील तब्बल सव्वा कोटी शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र मध्ये यावर्षी खरीप हंगामात 1 कोटी चाळीस हेक्‍टरवर पेरणी करण्यात आली असून.

हे वाचा: रब्बी ज्वारी पेरताय, करा या वाणाची लागवड व मिळवा मोठ्या प्रमाणात उत्पादन..!

कमी झालेल्या पावसामुळे राज्यातील 800 हून अधिक महसूल मंडळामध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या हातातून उडीद, मूग, सोयाबीन यांसारखी पिके गेली आहेत.

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा-

राज्यातील अनेक जिल्ह्यात सरसकट पिक विमा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पिक विमा जमा करण्यात येणार आहे.

परंतु शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनीला शासनाद्वारे अद्याप पैसे मिळाले नव्हते. परंतु धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिक विमा कंपनीला आता निधी वितरित केला असून

शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत पिक विमा योजनेचे पैसे जमा केले जातील. पिक विम्याच्या निकषानुसार सलग 21 दिवस झालेल्या पावसाच्या खंडामुळे बऱ्याच मंडळात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा मंडळामध्ये 25 टक्के आगाऊ पिक विमा उपलब्ध करून देण्याची हमी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. Pik vima

Leave a Comment