शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सव्वा कोटी शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के पिक विमा

यावर्षी राज्यातील तब्बल एक कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. ‘ रुपयात पिक विमा’ या योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वाट्याचे 406 कोटी रुपये पिक विमा कंपन्यांना वितरित केले आहेत.

पावसाच्या खंडामुळे झालेल्या खरीप हंगामातील नुकसाना झालेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.साधारणतः येथे 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल.

हे वाचा: ज्ञानराधा बँकेच्या ठेवी खरंच सुरक्षित आहेत का..? पैसे बुडाले का..? शेतकऱ्यांनो लगेच वाचा

यावर्षी खरीप हंगामात एक कोटी चाळीस लाख 97 हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. परंतु कालांतराने पावसाच्या खंडामुळे राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये याचा मोठा फटका बसला. खरीप पिकांची उत्पादकता घटली.

महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 25 सप्टेंबर पर्यंत सरासरीपेक्षा 40% पेक्षा कमी पाऊस झाला. त्यावेळी त्या जिल्ह्यातील तब्बल 456 महसूल मंडळामध्ये हा एक महिन्याचा पावसाचा खंड पाहायला मिळाला.

त्यानंतर दुसरीकडे 588 मंडळामध्ये 15 ते 21 दिवस पावसाचा खंड पाहायला मिळाला. यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यावर पर्याय म्हणून त्या जिल्ह्यातील 15 जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाई संदर्भात अधिसूचना काढली.

हे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ..! पहा आजचे कापुस बाजार भाव Cotton New price's

परंतु एक रुपयात पिक विमा या योजनेचे पैसे शासनाद्वारे पिक विमा कंपनींना वितरित करण्यात न आल्यामुळे पिक विमा कंपन्या सुद्धा शांत होत्या. परंतु आता सरकारने पैसे वितरित केले असून. त्यापूर्वी विम्यासाठी व केंद्र वराज्य सरकारचा 3000 कोटींचा हिस्सा देखील विमा कंपन्यांना वितरण करण्यात आला आहे.

विमा कंपनीने केले प्रश्न प्रशासनाची कोंडी

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप पिका संदर्भात अधिसूचना काढून 21 दिवस झाले आहेत. परंतु या अधिसूचनेवर विमा कंपन्यांनी आक्षेप घेतल्यामुळे तेथील प्रशासनाची कोंडी झाली आहे. विमा कंपनीने दिलेल्या माहिती नुसार, सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी साडेतीन लाख हेक्टर वर झाली आहे.

हे वाचा: Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! सरकारने शेतकऱ्यांची...

आणि पिक विमा साठी तब्बल साडेपाच लाख हेक्टर वरील अर्ज प्राप्त झाले आहेत. व दुसरीकडे इतर जिल्ह्यांमध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये 21 दिवसापेक्षा कमी पावसाचा खंड असतानाही. सरसकट च जिल्ह्यासाठीच अधिसूचना निघाली आहे.

याच दरम्यान मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यासंदर्भात कोणतेही नियम व अटी नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी कंपन्यांना कळविले आहे. आता त्या बाबीवर देखील जिल्हाधिकाऱ्यांना तोडगा काढावा लागणार आहे.

पिक विम्याची रक्कम मिळणार लवकरच…

एक रुपयात पिक विमा या योजनेचा सरकारचा हिस्सा आता मिळाला आहे. व त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारचा विमा पोटीचा तीन हजार कोटी रुपयांचा हिस्सा देखील वीमा कंपन्यांना मिळाला आहे. आता लवकरच विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई वितरित केली जाईल.

Leave a Comment