पुढील तीन दिवसातच राज्यातील या भागात पाऊस..! पहा सविस्तर

गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे. हवामान कोरडे झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु हवामान खात्याने दिलेल्या नवीन माहितीनुसार येत्या तीन दिवसात राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कधी आणि कुठे पाऊस पडेल?

हे वाचा: घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस; राज्यातील या जिल्ह्यांना इशारा heavy rain

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये 17 ऑक्टोबर रोजी मुंबई, कोकण, खानदेश, नाशिक या परिसरात पावसाचा जोर अधिक राहील.  त्याचबरोबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी पाऊस पडेल. अशी माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे. तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा बरसत राहील.

18 ऑक्टोबरपासून काय होईल?

हवामान खात्याने दिलेला अंदाजानुसार राज्यात 18 ऑक्टोबर पासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. मराठवाड्यात आणि कोकण भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

हे वाचा: पावसाचा मुक्काम वाढणार..! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा Heavy rain

शेतकऱ्यांना काय करावे लागेल?

हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाच्या पुढील प्रमाणे काही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. तूरळक पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पावसाच्या वेळी शेतात जाणे टाळावे.

हे वाचा: स्कायमेट चा हवामान अंदाज; पुढील 2 दिवस या भागात मुसळधार पाऊस; असं राहणार महाराष्ट्रात हवामान havaman andaj

Leave a Comment