महाराष्ट्रातील या भागात जोरदार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार

शेतकरी मित्रांनो नमस्कार अखेर महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो काल पोळा झाला. कालपासूनच बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

आज 15 सप्टेंबर आज सकाळपासूनच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आणि पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे अखेर चांगल्या पावसाला सुरुवात झालीच आहे.

हे वाचा: राज्यात पुन्हा पाऊस वाढणार..! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

आज दुपारपासून मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोकणाच्याही बऱ्याच भागात आज पावसाचा जोर वाढणार आहे. राज्याच्या उरलेल्या भागात सुद्धा येत्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस कोसळणार आहे.

पंजाबराव डख यांचा पावसाविषयी ताजा अंदाज..

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आत्ताच एक नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात 15 सप्टेंबर 16 सप्टेंबर 17 सप्टेंबर असाच 23 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडेल.

हे वाचा: पावसाचे संकट वाढले..! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा Havaman Andaj

काही ठिकाणी तर अतिवृष्टी सुद्धा त्यांनी सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. अशी माहिती हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी दिली.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून या तारखांना योग्य ती काळजी घ्यावी. आपल्या गुराढोरांना घरी आणावे. सुरक्षित जागेवर बांधावे. या पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा सुकवणार आहे. अशी माहिती पंजाबराव यांनी दिली.

हे वाचा: यंदा नवरात्रात कुठे पडणार मुसळधार पाऊस..? पहा पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज panjab dakh

Leave a Comment