राज्यातील या भागात जोरदार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्याकडे कधी येणार

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. आज सात सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात पावसाने सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजा नुसार महाराष्ट्र मध्ये पाऊस पडत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान विभाग दिला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा: ई पीक पाहणी साठीची शेवटची तारीख जाहीर..! फक्त इतके दिवस बाकी

परंतु अजून सुद्धा राज्यातील बराच भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आज पासून पाऊस राज्यातील बऱ्याच भागात सक्रिय होईल. काही भागात ढगाळ वातावरण राहून उद्या म्हणजेच 8 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होईल.

तब्बल 21 दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर पावसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक ही खुश आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरलेल्या पिकांना जीवनदान मिळेल असे हवामान अभ्यासक म्हणत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी हात आठ सप्टेंबर ची पहाट होण्याची वाट बघावी. आठ सप्टेंबर नंतर राज्यातील प्रत्येक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यातील नंदुरबार वाशिम परभणी या जिल्ह्यात पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे.

हे वाचा: दुष्काळ जाहीर करण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच मोठे विधान

त्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज मराठवाड्यासोबतच विदर्भातही बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. आता लवकरच उकाड्यापासून दिलासा देखील मिळणार आहे.

Leave a Comment