राज्यातील या 6 जिल्ह्यात आज पासून मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काल शनिवारी राज्यातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. आजही राज्यामध्ये विविध भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोकण उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.

हे वाचा: पहा जानेवारी महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडणार का..? काय म्हणतात पंजाब डख Panjab Dakh

त्याचबरोबर मुंबई ठाण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील विदर्भातील विविध जिल्ह्यात पावसाने दोन दिवसापासून चांगली हजेरी लावली आहे.म्हणून तेथील शेतकरी सुखावला आहे. परंतु राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

हे वाचा: IMD: येत्या 24 तासात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ..!

Leave a Comment