येत्या 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अलर्ट

ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यामध्ये पाऊस चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या तीन दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

परंतु काही जिल्ह्यात अजून सुद्धा पावसाला सुरुवात झालेली नाही. मराठवाड्यातील विदर्भातील व कोकणातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 11 सप्टेंबर 2023; kanda bajar bhav

सुकून गेलेली पिके पुन्हा एकदा पाठवत आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. त्यामुळे मुंबईकरांसोबतच इतर जिल्हेही सुखावले आहेत.

पुढील एक ते दोन दिवसात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड व विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील दोन दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभाग खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हे वाचा: आज राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर..! Havaman Andaj

त्याचबरोबर कोकणातील रायगड ठाणे सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आपल्याला सुद्धा ऑरेंज या जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी पाऊस पाहून आपले कामे करावीत.

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व नांदेड या जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून संत धार गतीने पाऊस सुरू आहे.

त्यामुळे या भागातील अनेक नदी नाल्यात तुडुंब भरून वाहत आहेत. पावसामुळे धरणांची आवक सुद्धा वाढली आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज पासून पावसाचा जोर वाढणार आहे.

हे वाचा: आजचे गुजरात मधील कापुस बाजार भाव 7 सप्टेंबर 2023

Leave a Comment