येत्या 24 तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा मोठा अंदाज

राज्यामध्ये चार दिवस झाले दडी मारून बसलेला पाऊस. आता पुन्हा एकदा परतणार आहे. हवामान अभ्यासाकांनी पुढील येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना तर पावसाचा अलर्ट देखील देण्यात आला आहे.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याने शेतकरी आनंदीत आहेत. राज्यात आजपासून अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे वाचा: IMD: या जिल्ह्यात पडणार आज तुफान पाऊस..! IMD चा मोठा अलर्ट

ऑगस्टमध्ये दांडी मारून बसलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात पुन्हा परत येईल असे हवामान अभ्यासाक म्हणत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी पासून पावसाला हळूहळू सुरुवात झाली होती.

परंतु पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजा चिंतेत आला होता. आता परत एकदा 14 सप्टेंबर पासून मान्सून सक्रिय होत आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा मान्सून सक्रिय झाला आहे.

पुढील 24 तासात या जिल्ह्यात पाऊस..

हे वाचा: पुढील 24 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..! पहा पावसा विषयी महत्त्वाचा अंदाज Heavy rain

राज्यामध्ये पुढील 24 तासात पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पावसाचा येल्लो अलर्ट आहे.

तर येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर व विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

हे वाचा: स्कायमेट चा हवामान अंदाज; पुढील 2 दिवस या भागात मुसळधार पाऊस; असं राहणार महाराष्ट्रात हवामान havaman andaj

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याचे रूपांतर आता लवकरच कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे राज्यातील मान्सून सक्रिय होणार आहे. विदर्भ आणि कोकणात येत्या 13 आणि 17 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

राज्यामध्ये अजून सुद्धा पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे यावर्षी परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. या पावसावरच रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Leave a Comment