पुढील पाच दिवसात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात पुढील पाच दिवस विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण आणि मराठवाडा या भागात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस होणार आहे.

पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज…

हे वाचा: rain update: आज पासून राज्यातील या भागात होणार पावसाला सुरुवात..! वाचा सविस्तर

भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

मान्सूनच्या आगमनापासूनच राज्यात पाऊस कमी पडत आहे. खरीप पेरणी ला पाहिजे तेवढा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्णपणे खरीप पेरण्या खोळंबल्या गेल्या. आता हवामान विभागाने परत एक नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार राज्यांमध्ये 20 सप्टेंबर पर्यंत विविध भागात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्र मध्ये आज पाऊस पडेल का..? पाऊस अजुन किती दिवस आहे

हे वाचा: राज्यावर 2 चक्रीवादळांचे मोठे संकट, सोयाबीन भिजणार..? या जिल्ह्यांना हाय अलर्ट cyclone in maharsahtra

हवामान खात्याने महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई, पुणे, नंदुरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, सातारा व रत्नागिरी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.  त्याचबरोबर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान दिली आहे.

Leave a Comment