पुढील दोन ते तीन तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..! पहा हवामान विभागाचा ताजा अंदाज

शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी एक आनंदाची आणि अतिशय मोठी बातमी आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा वेग आता कमी झाला आहे. व त्याचे रूपांतर चक्रावर वाऱ्याच्या रुपात होत आहे. ही प्रणाली पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.

मान्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा यावेळी ईशान्य ते जैसलमेर या भागापर्यंत पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व आणि पश्चिमेकडून वाहत असलेल्या वाऱ्याचे जोडशेत्र आहे.

हे वाचा: कापूस पिकासाठी चौथी फवारणी कोणती करावी..? जाणून घ्या

राज्यामध्ये शुक्रवारी पहाटपासून बऱ्याच ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला पाहायला मिळाला. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. तर विदर्भात आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यात मुख्य कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर राज्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. याच दरम्यान खानदेश आणि विदर्भात सुद्धा चांगला पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आलेला आहे.

राज्यातील या भागात आज कोसळणार पाऊस

हे वाचा: आज पासून राज्यात वाढणार पावसाचा जोर..! हवामान खात्याची मोठी अपडेट

हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रातील नगर ,पुणे, सातारा, नाशिक कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

विदर्भातील अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघकर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये वातावरण निवडले आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून सूर्यप्रकाशाचे दर्शन झाले आहे. परंतु तरीपण येत्या 24 तासात मुसळधार पाऊस मुंबईमध्ये होऊ शकतो असा अंदाज कृष्णा आनंद होसरीकर यांनी दिला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 4 सप्टेंबर 2023

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment