या 27 जिल्ह्यात पडणार आज मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडी तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विदर्भ,मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. आज 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्वत्र भागात आज पासून पावसाला सुरुवात होणार आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय..

हे वाचा: अरबी समुद्रात घोंगावतंय तेच चक्रीवादळ, पुढच्या 48 तासात या जिल्ह्यात येऊन धडकनार 'Tej'. Low pressure

बंगालच्या खाडी तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यासोबत, कोटा रायसेन बिकानेर या भागात सुद्धा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचबरोबर बंगालच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

असे विविध भागात कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाल्यामुळे. पावसासाठी मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे. नंदुरबार, पालघर, ठाणे, वाशिम, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, छत्रपती संभाजीनगर सातारा नगर यवतमाळ बुलढाणा व अमरावती या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा आहे.

हे वाचा: panjab dakh: पंजाबराव म्हणतात ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून राज्यात अतिवृष्टी

आज कुठे पाऊस पडणार..?

विविध भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. वरील राज्यात सर्वत्र पावसाचे पोषक वातावरण तयार झाले आहे.

तर चला पाहूया आज कोणत्या जिल्ह्यात आणि कोठे पाऊस पडणार…

हे वाचा: पंजाबराव डख म्हणतात राज्यातील या भागात 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस..! panjab dakh andaj

कोकणातील रायगड, पालघर, ठाणे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, नाशिक, नंदुरबार व विदर्भातील वाशीम ,अकोला. आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी घराबाहेर पडतानी योग्य ती काळजी घ्यावी.

Leave a Comment