14 सप्टेंबर पासून या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

मध्य प्रदेश आणि राजस्थान लगतच्या असलेली चक्रीय प्रणाली लांब सरकली आहे. त्यामुळे काल रात्रीपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ईशान्य राजस्थान ते छत्तीसगड या राज्यांमध्ये द्रोनिक स्थितीचा परिणाम विदर्भात होऊ शकतो.

अरबी समुद्रावरून येणाऱ्या चक्रीय वाऱ्यामुळे कोकणात पुढील सहा ते सात तासात मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.

हे वाचा: राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नुकसान भरपाई

आज कोकणासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. गुरुवारपर्यंत कोकणामध्ये पाऊस राहणार आहे. तर मराठवाड्यातील आणि विदर्भातील पावसाचा जोर कमी होईल.

असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढच्या रविवारी गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुढील चार आठवड्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज आहे. आजपासून ते 14 सप्टेंबर पर्यंत कोकणात पाऊस पडू शकतो.

यादरम्यान मराठवाड्यात आणि विचारतात कोरडे हवामान राहील तर कधी कधी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. परत 15 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर पर्यंत विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे. त्यानंतर 22 सप्टेंबर पासून ते 28 सप्टेंबर व 29 सप्टेंबर पासून 5 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसेल

हे वाचा: राज्यातील या 20 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा...! जाणून घ्या सविस्तर

पुणे घाटमाथ्यावर झालेल्या अवकाळी पावसामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 13 सप्टेंबर पासून विदर्भातील बऱ्याच भागा त मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

त्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. याच सोबत मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड लातूर व उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यांना सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे.

कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा या ठिकाणी 14 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

हे वाचा: पहा तुमच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कधी होणार? हवामान खात्याकडून मोठे अपडेट

Leave a Comment