panjab dakh: राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून या भागात मुसळधार पावसाला सुरुवात..! पंजाबराव डख लाईव्ह अंदाज

महाराष्ट्राचे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आत्ताच एक नवीन अंदाज दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यामध्ये आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबर पासून पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे.

पूर्व विदर्भापासून पावसाची गती वाढत जाणार आहे. तो पाऊस पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणपट्टी व महाराष्ट्रातील सर्व भागात पोहोचणार आहे. अशी माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात पाऊसच पाऊस..! पहा कृत्रिम रित्या पडणार पाउस Artifical rain in Maharashtra

त्यांच्या अंदाजानुसार 22 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पाऊस पडेल. त्यांच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधव यांची थोडीफार चिंता कमी झाली आहे. त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये असेही नमूद केले आहे की यावर्षी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडणार आहे.

पाऊस खूप जोरात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी चिंता करण्याची गरज नाही. येत्या चार दिवसात राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल. त्याचबरोबर नदी नाल्या तुटुंब भरून वाहतील असे देखील पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजात नमूद केले आहे. या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, व बीड जिल्ह्यात पाहायला मिळेल.

राज्यातील सर्वच भागात 22 सप्टेंबर पाऊस हजेरी लावेल असं पंजाबराव डख म्हणतात. खास करून जिल्ह्यात निफाड भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता पंजाबराव डख यांनी आहे.

हे वाचा: अखेर महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या इकडे कधी पडणार

या पावसामुळे तेथील पिकांना जीवनदान मिळेल असे देखील पंजाबराव म्हणतात. राज्यामध्ये पुन्हा 26,27,28,29,30 सप्टेंबर दरम्यान पावसासाठी पोषक  वातावरण तयार होईल. अशी माहिती देखील पंजाबराव यांनी दिली आहे.

Leave a Comment