राज्यातील या भागात दमदार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या इकडे कधी पडणार

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. इगतपुरी तालुक्यात सोमवारी सायंकाळ पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे दारणा धरणातील पाण्याची पातळी देखील वाढली आहे.

त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचे स्थिती दारणा धरणातून 5 हजार 100 क्यू सीखने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हे वाचा: पंजाब डख म्हणतात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; या तारखेपासून पुन्हा धो धो पाऊस Panjab Dakh Andaj

त्यामुळे त्यावर स्थित असलेल्या नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याचे दिसत आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यात सरासरी 6.4 मीमी पाऊस नोंदवला गेला आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात 26.1 मिमी, सुरगाण्यात 10.7 मिमी, पेठ तालुक्यात 9.7 मी मि, नाशिक तालुक्यात ९.६ मीमी, दिंडोरी तालुक्यात 4.6 मिमी, निफाड तालुक्यात 3.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक शहरातील इगतपुरी तालुक्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 10.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर त्या तालुक्यात दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. या पावसामुळे तेथील सामान्य नागरिक व बळीराजा सुखावला आहे.

पंजाब डख यांचा नवीन अंदाज

हे वाचा: येत्या 24 तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा मोठा अंदाज

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुद्धा नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.

Leave a Comment