जुन्या सोयाबीनला मिळतोय वाढता बाजार भाव..! नव्या सोयाबीनचे कसे राहणार भाव जाणून घ्या

महाराष्ट्रातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या सोयाबीनची 48 हजार 596 क्विंटल इतकी आवक करण्यात आली. त्याचबरोबर जुन्या सोयाबीनला सरासरी 6 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. व कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त 7251 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फलटण, बारामती, भिगवन, इंदापूर या भागातून सोयाबीनचे आवक होते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात या बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. परंतु आता तो 4 हजार 500 रुपये पर्यंत येऊन पोहोचला आहे.

हे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सोयाबीन बाजार भाव जाणार 10000 रुपयांवर Soybean market price

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक या महिन्यात सुरु होणार असून जुन्या सोयाबीनीचा दर हा 4500 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. पावसाच्या खंडामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील सोयाबीनची आवक घटण्याची शक्यता आहे. व येत्या काही दिवसातच सोयाबीनचे बाजार भाव तेजीत राहणार आहेत. अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.

यावर्षी बारामती तालुक्यात खरीप हंगामामध्ये एकूण सोयाबीन पिकाची 655. 40 हेक्टरवर पेरणी झाली. परंतु पावसाअभावी हे पेरलेली सर्व पिके धोक्यात आली. वेळेवर पाऊस न झाल्याने याचा मोठा फटका सोयाबीन पिकावर बसला.

कमी पडलेल्या पावसामुळे सोयाबीनवर विविध रोग देखील पसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50 टक्के एवढी घट होण्याची शक्यता आहे.

हे वाचा: NEW महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 13 ऑक्टोबर 2023

कृषी पर्यवेक्षक संतोष मोरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यात 2021-22 मध्ये सोयाबीन लागवड क्षेत्र हे 2003 हेक्टर एवढे होते. 2022-23 मध्ये हे क्षेत्र 1754 हेक्टर वर जाऊन पोहोचले. व आता २०२३- २४ साठी. हे क्षेत्र 655.40 हेक्टर वर येऊन पोहोचले आहे.

यावर्षी खरीप हंगामात कमी झालेल्या पावसामुळे व उशिरा आलेल्या पावसामुळे पेरन्या उशिरा झाल्या कमी पावसातच या पेरण्या झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. व माल सुद्धा कमी प्रमाणात लागला.

सरासरी 1.766 हेक्टर वर पेरणी आवश्यक असताना फक्त 655.4 वरच पेरणी झाली. त्यामुळे यावर्षी पेरणी क्षेत्रात सुद्धा घट झालेली दिसत आहे. व ज्यांनी पेरण्या केल्या त्यांची उगवणही कमी झालेली आहे.

हे वाचा: गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव 12 सप्टेंबर 2023

याचा थेट परिणाम सोयाबीनच्या आवकावर होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आवक कमी होणार आणि दर वाढणार असल्याची माहिती तज्ञांकडून दिली जात आहे.

Leave a Comment