नवीन हंगामात सोयाबीनीचे भाव कसे राहणार..? जाणून घ्या soyabean rate

यावर्षी पावसाच्या झालेल्या मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकावर मोठा परिणाम होणार आहे. पिकांचे उत्पादन घटना असा अंदाज देखील आहे. यावर्षी सरासरीपेक्षा महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक भाग म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र याच भागामध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी खूपच कमी पाऊस झाला त्यामुळे या भागातील सोयाबीन उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येणार आहे.

हे वाचा: यावर्षी कापूस 10000 रूपये प्रति क्विंटल होणार..? काय म्हणतात तज्ञ..? cotton market rate

त्याचबरोबर सध्याच्या काळात सोयाबीन पिकावर येल्लो मोजक आणि चारकॉल रॉट या रोगांचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात अजून विक्रमी घट होणार असल्याचा अंदाज केला जात आहे. या सर्वांचा विचार करता विविध संकटांना तोंड देत शेतकऱ्यांचा पदरात सोयाबीनचे पीक पडले आहे.

सध्याच्या काळात राज्यातील बऱ्याच भागात सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी करून मार्केटमध्ये सुद्धा नेण्यासाठी दाखल झाली आहे. परंतु सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांसाठी थोडी चिंता दायक बाब समोर येत आहे.

सध्या मार्केटमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. परंतु ही आवक खूपच कमी असली तरी, नवीन सोयाबीन बाजारामध्ये आल्यानंतर बाजार भाव थोडे घसरलेले पाहायला मिळाले.

हे वाचा: सोयाबीन दरात प्रचंड वाढ नवीन सोयाबीन 10000 रुपये प्रतिक्विंटल Soyabean rate

यामुळे बऱ्याच नैसर्गिक परिस्थितींना तोंड देऊन शेतकऱ्यांच्या पदरात पडलेल्या सोयाबीनला चांगला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पाहायला मिळाले आहे.

अमरावती बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनचे आवक झाल्यानंतर सोयाबीनचे भाव तब्बल 400 रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्या अगोदर 30 सप्टेंबर रोजी अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव पाहायला मिळाला होता.

परंतु 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या नवीन सोयाबीनचे आवकामध्ये सोयाबीन बाजारभाव तब्बल चारशे रुपयांनी घसरलेले पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा झाली आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई; पहा आत्ताच यादी compensation for damages

परंतु काही बाजार अभ्यासाकांचे असे ही मत आहे यावर्षी भारताबरोबरच अमेरिका ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये सोयाबीन पिकामध्ये मोठी घट झालेली आहे.

म्हणून परिणामी काही दिवसातच सोयाबीन भाव मध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळणार आहे. परंतु उत्पादनाबाबत आत्तापासूनच अंदाज करणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे भविष्यात सोयाबीनला काय भाव मिळतो हे आपण प्रत्यक्षात पाहणारच आहोत.

Leave a Comment