imd: आज पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात..! पहा कुठे कुठे पडणार

imd सध्या महाराष्ट्रातील विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाच्या मते आजही महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अंदाज आहे.

मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत आहे.

हे वाचा: पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..! पावसाबद्दल मोठा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यासह देशातील देखील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.25 ते 28 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील गोवा आणि कोकण या भागात मुसळधार पाऊस पडेल.

व वायव्य भारतात म्हणजेच हरियाणा व पंजाब या भागात विजांच्या गडगटेसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्याचबरोबर पश्चिम भारतात देखील हलक्या ते भारी स्वरूपात पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 27 आणि 28 सप्टेंबर महाराष्ट्रातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरात मध्ये देखील विविध पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा अंदाज..! ( maharshtra heavy rain)

वायव्य भारतातील पावसाचा हंगाम संपल्यानंतर, आता महाराष्ट्र राज्यात परत एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. व त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे.

काही ठिकाणी चक्रीय वाऱ्याची स्थिती तर काही ठिकाणी कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आज विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी विशेष तह काळजी घ्यावी.

हे वाचा: हवामानात अचानक बदल; पंजाबराव डख म्हणतात या भागात मुसळधार पाऊस... Panjab Dakh Andaj

राजस्थान मधून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता.

उत्तर पश्चिम भारतात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने. वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहताना दिसत आहेत. यामुळे पावसाने मान्सून मागे घेण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

आज पश्चिम राजस्थान मधून मान्सून माघारी फिरू शकतो. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांना वीजासह पावसाचा इशारा दिला आहे.

यामध्ये ठाणे, रायगड, नाशिक, नगर, जळगाव, पुणे, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याचां समावेश आहे. हवामान विभागाच्या मते बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवार पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.

Leave a Comment