IMD: आज रात्री राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह मुसळधार पाऊस पडू शकतो. असे हवामान विभागाने सांगितले आहे.

आज रात्री महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आयएमडी (imd) खात्याकडून देण्यात आलेला आहे. व उर्वरित  मराठवाड्यात आणि विदर्भात सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाचा येल्लो अलर्ट देखील जारी केला आहे.

हे वाचा: Panjabrao dakh: परतीच्या पावसाबद्दल पंजाबराव डख यांचं मोठं भाकीत..! वाचा सविस्तर

प्रामुख्याने 29 सप्टेंबर 30 सप्टेंबर यादरम्यानच पावसाचा जोर असेल. दोन ऑक्टोबर नंतर राज्यातील पाऊस ओसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, व मध्य महाराष्ट्रात ादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

देशात मानसून जरी माघारी फिरला असला तरी त्याचा जोर राजस्थान मध्ये कमी झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 25 सप्टेंबर दरम्यान राजस्थान मधून परतीच्या पावसाने प्रवास सुरू केला. परंतु त्याचा जोर जैसे थे वैसे आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही झाला.

हे वाचा: येत्या 24 तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा मोठा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. व पाच ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर, यांच्याकडून सुद्धा आज सायंकाळी सात वाजता नवीन अंदाज देण्यात आला. यांच्या अंदाजानुसार आज विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो.

प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर, यांच्या अंदाजानुसार पुढील काही तासातच विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाला चांगलीच सुरुवात होईल. हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा नवीन अंदाज Heavy Rain Maharashtra

विशेष म्हणजे कोकणातील रत्नागिरी, रायगड व पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर त्याचबरोबर विदर्भातील अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या अंदाजात वर्तवण्यात आली आहे. खास करून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मुळे आज रात्री राज्यातील बहुत अंश भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे वगळता महाराष्ट्रातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटामुळे व पावसाच्या धोक्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना खास खबरदारी घ्यायचे आव्हान हवामान विभागाने केले आहे.

Leave a Comment