imd alert: महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा..!

imd alert कोकण किनारपट्टी लगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे आज महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली, वाडा, पालघर, व उत्तर कोकणामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. आणि दुपारनंतर म्हणजेच रात्री सहा सात वाजेपर्यंत या परिसरामध्ये जोरदार ते अती जोरदार पाऊस पाहायला मिळेल.

हे वाचा: महाराष्ट्रात अजून इतके दिवस राहणार हवामान कोरडे ; काय म्हणतात पंजाबराव Panjabrao dakh Havaman Andaj

व त्याचबरोबर दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत उत्तर कोकणाच्या बऱ्याच भागांमध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळेल. नाशिक व नाशिक जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आज दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल.

उत्तर महाराष्ट्रातील मनमाड, धुळे, जळगाव, या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

नगर, जिल्ह्यातही आज दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळेल. बऱ्याच भागात हलका तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल.याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आज पाऊस बघायला मिळणार आहे.

हे वाचा: पावसाचे संकट वाढले..! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा Havaman Andaj

दक्षिण कोकणामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहील. तर घाटमातेच्या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातील सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

हे वाचा: panjab dakh: राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून या भागात मुसळधार पावसाला सुरुवात..! पंजाबराव डख लाईव्ह अंदाज

Leave a Comment