IMD: पुढील 48 तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणाली मुळे राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील 48 घंट्यात मराठवाडा व विदर्भात चौफेर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या तीन आठवड्यात जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी आता येईल त्या आठवड्यामध्ये पाऊस चांगला जोर धरणार आहे.

हे वाचा: पावसाचा मुक्काम वाढणार..! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा Heavy rain

आय एम डी पुणे विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्याने गोंदिया, रायगड, भंडारा, आणि नागपूर या जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

त्याचबरोबर 24 आणि 26 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात ही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. येत्या 25 आणि 26 सप्टेंबर महाराष्ट्रातील संपूर्ण भागात मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे.

हे वाचा: panjab dakh: पंजाबराव म्हणतात ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून राज्यात अतिवृष्टी

Leave a Comment