IMD: महाराष्ट्रातील या भागात 15 सप्टेंबर 2023 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात..!

सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागात हळूहळू पावसाला सुरुवात होऊ लागली. काही भागात चांगला पाऊस देखील पडला. परंतु आता एकदमच पावसाने परत एकदा उघडीप दिली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न तयार होत आहेत. आता परत पावसाला सुरुवात होणार की नाही..? खरीप पिकांचे काय होणार..?

हे वाचा: IMD alert: राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अलर्ट

अशातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलो आहोत. हवामान अभ्यासाकांच्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या मार्गे येणारा पाऊस उत्तर महाराष्ट्रात 15 ते 19 सप्टेंबर दरम्यान येण्याचा अंदाज आहे. या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्रात 70 ते 130 मिलिमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून परतवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात फक्त पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा ही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ही थांबवला आहे.

2022 च्या काळात सप्टेंबर महिन्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात 106.5% इतका पाऊस झाला होता. मात्र यावर्षी त्याचे प्रमाण 65.4 टक्क्यावर आले आहे. 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर यादरम्यान पुणे घाट माथ्यावर पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे.

हे वाचा: Panjabrao dakh: परतीच्या पावसाबद्दल पंजाबराव डख यांचं मोठं भाकीत..! वाचा सविस्तर

याच दरम्यान 28 ते 29 सप्टेंबर दरम्यान परतीच्या पावसाच्या ढगा मुळे 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. यावर्षीच्या कमी झालेल्या पावसामुळे धरणांचा साठा ही कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची चिंता सतवणार आहे.

Leave a Comment