महाराष्ट्रामध्ये या तारखेपासून परतीचा पावसाला सुरुवात..!

या वर्षी राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस यायला खूप उशीर झाला होता. जून मध्ये येणारा मान्सून महाराष्ट्र मध्ये जुलैमध्ये आला त्यामुळे सर्व खरीप पेरण्या कोळंबल्या त्यानंतर परत पावसाने ऑगस्ट महिन्यात सुद्धा तब्बल 21 दिवसाचा खंड दिला त्यामुळे खरीप हंगामात आलेली पिके करपून गेली.

आता शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची अपेक्षा आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी परतीच्या पावसाचा मुहूर्त देखील लांबणार आहे. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात सारखा पाऊस सुरू असल्यामुळे.

हे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! येत्या दोन महिन्यात सोयाबीनला मिळणार एवढा भाव Soyabean market rate

वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अजून सुद्धा पोषक हवामान तयार झालेले नाही. जेव्हा पाऊस वायव्य भारतात उघडीत देतो तेव्हा परतीच्या पावसाला सुरुवात होते.

गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी मान्सूनचे वारे राजस्थान मधून माघारी फिरले होते. जेव्हा पाऊस वायव्य भारतात सलग पाच किंवा पाच दिवसापेक्षा अधिक दिवस उघडीप देतो. किंवा आद्रता कमी होऊन कोरडे हवामान तयार होते.

अशावेळी या भागातील मान्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते. मान्सून येण्याची आणि परतण्याची तारखांची सुधारित वेळापत्रकानुसार 17 सप्टेंबर मान्सूनचा राजस्थान मधून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हे वाचा: तुरीचे बाजार भाव 10000 रुपयावर; नवीन मालाची आवक वाढल्यानंतर भाव तसेच राहणार..? पहा काय म्हणतात व्यापारी Market price of Turi

परंतु सध्याच्या काळात राजस्थानसह वायव्य भारतात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तसेच या भागामध्ये आणखीन पाऊस पडण्यासाठी सुद्धा पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पावसाच्या परतीच्या प्रवासालाही उशीर होणार असल्याची शक्यता आहे.

Leave a Comment