नव्या सोयाबीनीची आवक सुरू, इतका मिळतो बाजार भाव..!

आता खरीप हंगामातील सोयाबीन काढण्यासाठी येत आहे. बऱ्याच भागात यावर्षी सोयाबीनची पेरणी लवकरच करण्यात आली होती. अशा भागातील सोयाबीन आता काढण्यासाठी येत आहे. जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव गावात खाजगी व्यापाऱ्यांकडून नवीन सोयाबीनची आवक करण्यास सुरुवात झाली आहे.

कुंभार पिंपळगाव गावातील बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनला 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटल इतका दर देखील मिळाला. कुंभार पिंपळगाव आतील बाजार समितीमध्ये सुमारे 30 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

हे वाचा: bajar bhaw: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 2 ऑक्टोबर 2023

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबाजी सोपान डोईफोडे या शेतकऱ्यांनी 13 जून रोजी सोयाबीन ची लागवड केली होती. व ती सोयाबीन काढून त्यांनी बाजारात विक्रीसाठी सुद्धा आणली. यावर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, पावसाच्या खंडामुळे उत्पादनातही घट झाली आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांची अजून सुद्धा सोयाबीन काढायची बाकी आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी सुरू आहे. शेतकरी सोयाबीन काढणीनंतर घरात न ठेवता मिळेल त्या भावाने विक्रीसाठी लगेच बाजारात घेऊन येत आहेत.

कुंभार पिंपळगाव गावातील व्यापारी अविनाश शिंदे यांच्या दुकानात बुधवारी नव्या सोयाबीनची खरेदी सुरू झाली. यावेळी तेथील बाजार समितीच्या वतीने सोयाबीन उत्पादक शेतकरी लिंबाजी डोईफोडे यांचा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

हे वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कापुस बाजार भावात होणारं मोठी वाढ; सरकारने घेतला मोठा निर्णय cotton market price

Leave a Comment