पीक विम्या बाबत आली आनंदाची बातमी..!15 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा..? insurance new

insurance new: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आगाऊ विम्याची रक्कम जमा केलेली नाही. 15 डिसेंबरपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात.

जमा न केल्यास शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात कंपनीच्या विरोधात ताळेबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांचे 50 हजार रुपयापर्यंत कर्ज माफ loan waiver

यंदा जून आणि जुलैमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे कहर झाला. त्यानंतर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पीक विमा अधिसूचना लागू केली होती.

शासन निर्णयानुसार विम्याची रक्कम महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. परंतु विमा कंपनीने अद्याप विम्याची रक्कम खात्यात वर्ग केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम मिळाली होती.

मात्र यंदा डिसेंबरचा पहिला आठवडा संपूनही उशीर होत असल्याने शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पीक विमा कंपनीला 15 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

हे वाचा: पहिल्या टप्प्यात या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई..! यादी जाहीर compensation for damages

अन्यथा 16 डिसेंबर रोजी कंपनीला टाळे ठोकू, असा इशारा देण्यात आला आहे. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी बालाजी पाटील सांगवीकर, बालाजी पाटील ढोसणे, गणपत पाटील सुडके, प्रकाश शिंदे हसनाळकर, रावसाहेब शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

1 thought on “पीक विम्या बाबत आली आनंदाची बातमी..!15 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा..? insurance new”

  1. Sir still not received 25% sanctioned vima insurance… I personally visit tehsil office but he cant given proper answer… I am farmer but govt policy not getting… I am confused why not received vima

    Reply

Leave a Comment