तुमची ई पिक पाहणी नोंदणी पूर्ण झाली का..? असे तपासा व पहा तुमच्या गावातील यादी

अनेक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांच्या पिक पाहणी पूर्ण झाल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची ई पिक पाहणी नोंद अजून सुद्धा राहिली आहे.

जर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. ई पिक पाहणी नोंद केली नाही. तर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घेताना अडथळे निर्माण होऊ शकतात.

हे वाचा: Agriculture insurance: येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा ई पिक पाहणी पूर्ण केली नाही. अशांनी आपल्या पिकाची पीक पाहणी करून घ्यावी. बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी नोंद करण्यास सुरुवात देखील केली आहे. तर काही शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे.

आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे की, आम्ही ई पिक पाहणी पूर्ण केली आहे. परंतु त्याची नोंद झाली की नाही. हे कसे तपासायचे तर त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

अशाप्रकारे बघा ई पीक पाहणी यादी..

हे वाचा: शेत जमिनीचा नकाशा काढा घरी बसल्या ते पण तुमच्या मोबाईल वरून; आत्ताच पहा प्रक्रिया Land Map

1) गुगल प्ले स्टोअर वरूनई पिक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप डाऊनलोड करा

2) तुम्ही ज्या विभागात राहता तो विभाग निवडा

3) खातेदारांचे नाव निवडा

हे वाचा: ही पद्धत वापरून पहा आपल्या जमिनीचा नकाशा..! वाचा संपूर्ण स्टेप Online Land Map

4) चार अंकी संकेतांक नंबर टाकून लॉगिन करा

5) लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यातील पीक माहिती या पर्यायावर टच करा

6) पिकांची माहिती पहा या बटनावर टच करा

7) जसे तुम्ही पिकांची माहिती पहा या बटनावर टच कराल तसे तुम्ही नोंदणी केलेल्या पिकाची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

याप्रकारे पहा पिक पाहणी नोंदणी यादी..

जर तुम्हाला तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली आहे. व किती शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अजून सुद्धा प्रलंबित आहे. हे पाहायचे असेल तर तुम्हाला ई पिक पाहणी या ॲपवर जाऊन तुम्ही त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.

हे पाहण्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी ॲपच्या मुख्य मेनू वर जा त्यानंतर तुम्हाला तिथे विविध पर्याय दिसतील त्यापैकी गावाचे खातेदारांची पीक पाहणी या पर्यायावर क्लिक करा.

जसे तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करा तसे तुम्हाला तुमच्या गावातील ई पीक पाहणी यादी दिसेल. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पिक पाहणी पूर्ण झाली आहे. अशा शेतकऱ्यांच्या नावाखाली हिरवा रंग दिसेल व ज्या शेतकऱ्यांची ई पिक पाहणी अजून सुद्धा प्रलंबित आहे. अशा शेतकऱ्यांच्या नावाखाली पांढरा रंग दिसेल.

तर या पद्धतीद्वारे तुम्ही तुमच्या गावातील ई पीक पाहणी यादी पाहू शकता. धन्यवाद

Leave a Comment