यावर्षी कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव ;जाणून घ्या

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे सोयाबीन महाराष्ट्रातील निम्मे शेतकरी सोयाबीन या पिकाचे दरवर्षी उत्पादन घेतात.

सोयाबीन लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत सोयाबीनची खूप काळजी घ्यावी लागते. यावर्षी सुद्धा सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न देखील येत असेल की, यावर्षी सोयाबीनला किती भाव मिळेल.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे हरभरा बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

तर त्याविषयी आज आपण या लेखातून पाहणार आहोत. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे त्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यामुळे सोयाबीनचे खरीप हंगामातील उत्पादन घटले आहे. त्यामुळे सोयाबीनचे देशातील उत्पादन देखील घटेल. यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

सोयाबीनच्या जागतिक बाजारपेठेवर दोन देशांचा जास्त प्रभाव असतो ते दोन देश म्हणजे ब्राझील आणि अमेरिका हे दोन देश जागतिक सोयाबीन बाजारावर आपले वर्चस्व राखून आहेत. या दोन देशाच्या बाजारानुसारच जागतिक सोयाबीन बाजार आणि आपला बाजार भाव चालत असतो. त्यामुळे आपल्याला सहाजिकच ब्राझील आणि अमेरिका कडे पाहावं लागतं.

हे वाचा: डाळिंब भावाने गाठली उच्चांकी..! पहा राज्यातील आजचे डाळिंब बाजार भाव

आणि त्या बाजार कडे लक्ष ठेवावे लागते. जागतिक सोयाबीन बाजारावर एक नंबरला असलेला देश म्हणजे ब्राझील आणि दुसऱ्या नंबरचा अमेरिका आणि तीन नंबरचा देश म्हणजे अर्जेंटिया हे तीन देश एकूण जगात जेवढे सोयाबीन उत्पादन होतं त्यापैकी 80 टक्के उत्पादन घेतात. म्हणजेच या तीन देशांची पकड सोयाबीन पिकावर चांगलीच आहे.

असे म्हणायला हरकत नाही. मागच्या वर्षीचा आणि यावर्षीचा समीकरण पाहून घेऊया मागच्या वर्षी ब्राझील देशा सोयाबीन उत्पादनात आघाडीवर होता. परंतु अमेरिका आणि अर्जेंटिया या देशाचे उत्पादन घटले होते.

हे उत्पादन घटनेचे मुख्य कारण म्हणजे या दोन्ही देशांना दुष्काळचां सामना करावा लागला होता. यावर्षी अर्जंट यामध्ये चांगलाच पाऊस आहे. म्हणजे सहाजिकच या देशाचे सोयाबीन उत्पादन वाढणार आहे.

हे वाचा: कांदा बाजार भाव पोहोचला विक्रमी पातळीवर..! शेतकऱ्यांना यंदा कांदा हसवणार

हे उत्पादन वाढल्यानंतर साहजिकच आपल्याकडे सोयाबीन बाजार भाव नरम होतात. याचा अनुभव आपल्याला यंदा येण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील सोयाबीनचे उत्पादन वाढल्यावर भाव कमी होऊ शकतो.

परंतु यंदा आपल्याकडे सुद्धा दुष्काळामुळे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भाव वाढायला पाहिजेत. दोन वर्षांपूर्वी सुद्धा असेच झाले होते. आपल्याकडे सोयाबीनचे उत्पादन सरासरी इतके होते.

परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढलेले होते. म्हणजे त्यावेळेस दबावत नव्हती. त्यामुळे आपल्या इकडे सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला. त्याचं मुख्य कारण म्हणजे खाद्यतेल व सोयाबीनचा भाव.

खाद्य व सोयाबीनचे भाव तेजीत होते त्यामुळे साहजिकच सोयाबीनला चांगला भाव मिळाला. राज्य सरकारने केले असे की खात तेलाची हयात वाढवली व सोयाबीनची देखील आयात वाढवली त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले होते.

यावर्षीच सरकारने आयात वाढवल्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले. हे दर अजून सुद्धा दबावतच आहेत. आपल्या देशात गेल्यावर्षी 124 लाख सोयाबीनचे उत्पादन झालं होतं. त्यापैकी आता 33 लाख टन इतका सोयाबीन उत्पादन शिल्लक आहे.

म्हणजेच हा साठा पुढच्या हंगामासाठी उपयोगी होऊ शकतो. त्याचे प्रमाण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर यंदा उत्पादन देखील कमी होणार आहे. त्यामुळे सोयाबीनचा साठा विक्रमी असला तरी.

त्याचा जास्त दबाव सोयाबीन बाजारभाव होणार नाही. गेल्या वर्षी आम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनला 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळाला. यावर्षी आपल्या देशात सोयाबीनची किती उत्पादन होणार हे सांगता येणार नाही.

कारण सध्या सोयाबीनचे पिके फक्त 45 ते 50 दिवसाच्या आहेत. त्याचबरोबर पिकांचे नुकसान देखील खूप प्रमाणात होत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बिनघोर राहावे. यावर्षी सोयाबीनला गेल्यावर्षीपेक्षा चांगलाच बाजार भाव मिळणार. त्याचबरोबर यावर्षी निवडणुका देखील लागणार आहेत त्यामुळे सरकारला चांगला दर द्यावाच लागणार

Leave a Comment