सोयाबीनच्या नुकसानीसाठी पिक विमा मिळवण्याची शेवटची संधी..! लगेच करा अर्ज

महाराष्ट्र राज्यातील तब्बल नऊ जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूमुळे सोयाबीनवर बुरशीजन्य रोग, खोडकूच, मुळकुजने हे प्रभाव झालेले दिसत आहेत.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी चर्चा केली. व या नऊ जिल्ह्यात तातडीने कृषी विभाग आणि मदत व पुनर्विजन विभागाने पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत.

हे वाचा: कापूस विकावा की साठवून ठेवावा..? पहा काय म्हणतात तज्ञ cotton news

या जिल्ह्यांमध्ये आहे सर्वात जास्त सोयाबीन पिकावर मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव..

कमी झालेल्या पावसामुळे व पर्जन्यवृष्टीमुळे त्याचबरोबर तापमानातील चढ-उतार या बदलांमुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रभाव झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात पिवळा मोझॅक विशालचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळाला आहे.

या विषाणूमुळे सोयाबीनचे झाडे पिवळे पडू लागले आहेत. चंद्रपूर सह यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, लातूर, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पीएम किसान योजनेचा आणखी एक हप्ता new pm kissan

या जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचा पंचनामा करून आवश्यक ती मदत देण्यासाठी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment