या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर Loan waiver list

Loan waiver list: महाराष्ट्र सरकारने अखेर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर केली आहे. शेतकरी संघटनांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर ही बाब समोर आली आहे.

2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होते. 28 जून 2017 रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली.

हे वाचा: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा करणे सुरू..! तपासा आपले बँक खाते Crop insurance credit update

या योजनेनुसार, शेतकऱ्यांनी 30 जून 2016 पूर्वी घेतलेले 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज न भरलेले मुद्दल आणि व्याजासह माफ केले जाणार होते. मात्र, नंतर कर्जाची मोठी रक्कम पाहून सरकारने हे पोर्टल बंद केले. कर्जमाफी योजना लागू झाल्यानंतर सुमारे 5.56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.

या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी अधिवक्ता अजित काळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना सुमारे 6000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.

हे वाचा: ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार इतके रूपये अनुदान..! दसऱ्यापासून सुरुवात Tractor Anudan Yojana

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या कोर्टाने या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचे निर्देश दिले होते. तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नसल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली. आता या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1700 कोटी पिक विमा वितरन सुरु Dhananjay Munde

Leave a Comment