Mansoon: राज्यातून मान्सून परतला,हवामान विभागाची माहिती..!

परतीच्या दिशेने असलेले नैऋत्य मोसमी वारे आज म्हणजेच 9 ऑक्टोबर सोमवारी देशाच्या बऱ्याच राज्यातून बाहेर पडले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून देखील बाहेर पडले आहे.

परंतु महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात अद्याप मान्सून परतलेला नाही. दरम्यान सध्याच्या काळात मान्सूनसाठी पोषक वातावरण असून मान्सूनचा पाऊस लवकरच भारताच्या बाहेर पडेल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे.

हे वाचा: imd: या 6 जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अंदाज

गेल्या दोन वर्षापासून यावर्षी पहिल्यांदाच परतीचा पावसाला दोन आठवडे विलंब झाला आहे. यावर्षी मानसून उशिरा दाखल झाल्यामुळे त्याचा परतीचा प्रवासही उशिरा होत आहे अशी माहिती तज्ञांकडून वर्तवली गेली आहे.

तसेच बरोबर वेळेच्या आधीच मानसून अर्ध्या महाराष्ट्रातून बाहेर पडला आहे. त्यानंतर तीन दिवसातच म्हणजे नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण मानसून ने निरोप घेतला आहे. मान्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख की 10 ऑक्टोबर आहे. त्याआधी मानसून राज्यातील बहुतांश भागातून बाहेर पडला आहे.

देशातील महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातून मान्सून माघार घेतली आहे.

हे वाचा: rain update: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..! माणिकराव खुळे

सध्याच्या काळात मान्सूनच्या परतीची सीमा ही रकसोल, डाल्टनगंज, कंकर ते वेंगुलेरो पर्यंत आहे. आणि परतीची वाटचाल ही सुरू झाली आहे. भारतातून मान्सून लवकरच बाहेर पडेल अशी शक्यता ही हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

Leave a Comment