नमो शेतकरी महासन्मान, या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये..!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी राज्य सरकार द्वारे व केंद्र सरकार द्वारे नवनवीन योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये 3 हप्त्यात मिळून दिले जातात.

नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात येणार होता. परंतु आर्थिक तरतूद व तांत्रिक अडचणीमुळे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकला नाही. आता राज्य सरकारचा प्रयत्न आहे की, ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचा.

हे वाचा: अवकाळी नुकसान भरपाई मदत जाहीर..! या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणारं जमा compensation for damages

या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी विविध सॉफ्टवेअरच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबत जमा करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा हातभार लागेल. त्याचबरोबर आर्थिक मदत देखील होईल. व उत्पणात देखील वाढ होईल. .नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरची चाचणी अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण होताच.

त्यांच्या खात्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा होईल. अशी आशा आहे की, या चालू ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील.

हे वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय..! अवकाळी व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 36000 रुपये मदत weather and hail

Leave a Comment