नवीन कापूस विक्रीला सुरुवात, प्रतिक्विंटल किती मिळतोय भाव..?

पैठण तालुक्यातील पाचोडा बाजारपेठेमध्ये नवीन कापसाची आवक सुरू करण्यात आली असून रविवारी पैठण तालुक्यातील पाचोडा आठवडी बाजारात नवीन कापसाला 7 हजार 100 रूपये प्रति क्विंटल का भाव मिळाला.

पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना पावसाने चांगली दडी मारली होती. त्यामुळे याचा परिणाम कापूस पिकावर खूप मोठ्या प्रमाणात झाला.

हे वाचा: शेतकऱ्यांच्या कापसाला 12,000 तर सोयाबीनला 9,000 रुपयांचा बाजार भाव मिळणार..! रविकांत तुपकर Ravikant Tupkar

परंतु शेतकऱ्यांनी अपार कष्ट व अवकाळी मेहनत करून कसेबसे कापसाचे पीक जगवले. सध्या या गावाच्या परिसरात अनेक ठिकाणी कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांनी वेचलेला नवीन कापूस रविवारी आठवडी बाजारात विक्रीसाठी आणला. व या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांकडून 7 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव मिळाला.

कापुस बाजार भाव वाढवून मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी सध्या शेती खर्च धकण्यापुरता कापूस बाजारात विक्रीसाठी आणला असल्याची माहिती तेथील व्यापारी संजय कुमार सिटी यांनी दिली.

हे वाचा: पहा कांदा बाजार भावात तेजी..! इतका मिळतोय महाराष्ट्रात कांद्याला भाव (onion market rate)

शेतकऱ्यांना एक एकर जरी कापसाचे पीक घ्यायचे असले तरी साधारणतः 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च येतो. दुसऱ्या बाजूला कापसाला पाहिजे तेवढा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी राजा चिंतेत आला आहे.

शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी किती खर्च येतो..?

1)सुरुवातीला शेतकऱ्यांना शेतीची मशागत म्हणजेच नांगरट करण्यासाठी एकरी 2400 रुपय द्यावे लागतात.

हे वाचा: bajar bhaw: महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार भाव 16 सप्टेंबर 2023

2) त्यानंतर एकरी रोटर करण्यासाठी 2200 रूपये इतका खर्च येतो.

3) सरी व बियाणांसाठी 1500 आणि 1600 अनुक्रमाने लागतात.

4) शेतात शेतमजुरी 800

5) खते व बियाणांसाठी दहा हजार रुपये इतका खर्च येतो.

6) खुरपणी व फवारणी एकत्रित मिळून वीस हजार रुपये लागतात.

Leave a Comment