पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल दिला नवीन अंदाज. panjab dakh

panjab dakh हवामान विभागाचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी या अगोदर सुद्धा ऑक्टोबर महिन्यातील पावसाविषयी नवीन अंदाज दिला होता. अंदाज आपण उत्तम शेती या संकेतस्थळावर पाहिला होता.

ऑक्टोबर महिन्यातील पंजाबराव यांच्या पहिल्या अंदाजामध्ये त्यांनी असे नमूद केले होते की राज्यामध्ये नवरात्रीच्या कालखंडात नऊ दिवस मुसळधार पाऊस पडेल.

हे वाचा: सोन्याच्या किमतीत एकदमच मोठी घसरण, पहा इतक्या रुपयांनी घसरले सोन्याचे भाव Gold rate today

काल 3 ऑक्टोबर रोजी दिलेल्या नवीन अंदाजात पंजाबराव डक काय म्हणतात हे सविस्तर जाणून घेऊया. पंजाबराव यांनी दिलेल्या नवीन अंदाजामध्ये राज्यातील पावसाची वेळ, शेतकऱ्यांनी सोयाबीन कधी काढणे सुरू करा याबद्दल पंजाबराव यांनी अंदाज वर्तवला आहे.

पंजाबराव डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्या कोणत्याही प्रकारची अतिवृष्टी व जोरदार ते मुसळधार पाऊस होणार नाही. काही भागात दहा ते पंधरा मिनिटं थोडा पाऊस पडू शकतो. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्याचा सल्ला दिला आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सदृश्य पाहायला मिळाले परंतु पावसाने पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात खंड दिला. आणि सप्टेंबर महिन्यात परत एकदा पाऊसाला सुरुवात झाली.

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पहा पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी KCC Loan Waiver List

याव्यतिरिक्त, आता ऑक्टोबर मध्ये पाऊस होणार नाही. परंतु दिवाळीच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात पावसाचे जोरदार पुनारागमन होईल. असे पंजाबराव डख म्हणतात.

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीचा सल्ला तर दिलाच आहे. त्याचबरोबर हरभरा पेरणीचाही सल्ला दिला आहे. हरभऱ्याचे एकरी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शक सूचना देखील दिले आहेत

त्यामधे त्यांनी हरभरा पेरणीची वेळ, हरभरा बियाणांची निवड, पेरणीसाठी दोन पिकांमधील योग्य अंतर, त्याचबरोबर खत आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल डख यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

हे वाचा: सोन्याच्या किमतीत वाढ; युद्धानंतर 3300 रुपयांनी महागले gold rate increase

Leave a Comment