पाऊस न पडल्यास पिक विमा नाही..!

नमस्कार शेतकरी बांधवांनो पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी विमा करत आहेत. राज्यात पाऊस न झाल्याने त्याची नुकसान भरपाई देणार असे सरकारने सांगितले आहे.

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आली होती की जर 21 दिवस पाऊस नाही झाला तरच पिक विमा मिळेल. आता तब्बल एक महिन्यांच्या वरील झालं पावसाची काही खबर नाही.

हे वाचा: ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल पंजाबराव डख यांच‌ मोठ भाकीत..!

त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उभा राहत आहे की, शासनातली फसवणूक तर करत नाही ना. पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांचे झालेले नुकसान व त्याची भरपाई देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच येत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके जाग्यावर करपत आहेत. निपाणी गाव हे सिल्लोड तालुक्यात स्थित आहे. तेथील एका शेतकऱ्याने विमा कंपनीला कॉल केला तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं ” पाऊस पडला नाही तर विमा मिळणार नाही”

पिक विमा कंपन्यांशी बोलत असताना त्यांच्याकडून सांगण्यात आले की पाऊस न झाल्यामुळे नुकसानीसाठी पिक विमा मिळणार नाही..

हे वाचा: येत्या 24 तासात या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस..! पहा जिल्ह्यांची नावे

Leave a Comment