कांद्याला मिळतोय 6000 हजार रुपये प्रति क्विंटल भाव..! वाचा सविस्तर..

कांदा या पिकाचे उत्पादन महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी घेतले जाते. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देणारे कांदा हे एक प्रमुख पीक आहे. कांदा या पिकाची लागवड उन्हाळ्यात जास्त प्रमाणात केली जाते.

त्याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात घेतला कांदा जास्त दिवस साठवता येतो. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादनाला जास्त महत्त्व देतो. महाराष्ट्रातील कांद्याचे उत्पादन सर्वात जास्त घेणारा जिल्हा म्हणजे नाशिक. महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा मोठा हिस्सा आहे. त्यानंतर पुणे, अहमदनगर

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 11 सप्टेंबर 2023

हे पण जिल्हे आहेत. खरंतर कांदा हे पीक नगदी पिकांमध्येच मोडत. परंतु अलीकडच्या काळात कांद्याचे पीक शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. कित्येकदा तरी शेतकऱ्यांनी केलेल्या कांद्या पिकाचा खर्च सुद्धा निघालेला नाही.

कांदा पीक लागवड करताना जो खर्च लागतो तो खर्च सुद्धा या पिकातून भरून निघला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याच्या लहरी मध्ये आलेला मंद पणा अनेकदा कांदा बाजारात रद्दीच्या भावात देखील विकला जात नाही.

या चालू हंगामातच याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. यावर्षी कांदा हा फक्त दोन ते तीन रुपये किलोने बाजारात विकला गेला. यामुळे याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या खिशाला बसला.

हे वाचा: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 11 सप्टेंबर 2023; kanda bajar bhav

कांदा लागवडीसाठी लागणारा खर्च सुद्धा निघला नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की, सरकारने अनुदान देखील जाहीर केले. त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागला.

परंतु हे सरकारच्या डोळ्यात देखवले नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कांदा बाजार भाव पुन्हा एकदा मंदीकडे वळू लागला. परंतु आता परत पाच ते सहा दिवसापासून कांद्याला विक्रमी दर मिळतोय.

काल म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये कांद्याला तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. सोलापूर मध्ये देखील कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळाला.

हे वाचा: गट नंबर टाकून मिळवा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land map

कोणत्या कांद्याला मिळाला विक्रमी दर..!

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर मध्ये पांढऱ्या कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी भाव मिळाला. या कांद्याची मार्केटमध्ये 266 क्विंटल एवढी आवक झाली.

Leave a Comment