कांदा बाजार भावात तेजी, या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला सार्वधिक भाव..!

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यानंतर अडचणीत आलेला कांदा आता पूर्व पदावर आला आहे. सध्या राज्यातील प्रमुख कृषी कांद्याला 1800 ते 3,400 रुपये प्रतिक्विंटल इतका बाजार भाव मिळत आहे.

काल म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी प्रमुख एपीएम सी मध्ये कांद्याला पाच हजार रुपये एवढा सार्वधिक दर मिळाला. त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 26 सप्टेंबर 2023 soyabean bajar bhav today

काल चंद्रपूर जिल्ह्यातील गंजवाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 5 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. म्हणजेच प्रति किलोच्या भावाने 50 रुपये किलोने कांदा विकला गेला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 320 क्विंटल कांद्याचे आवक झाली असल्याची नोंद कृषी पणन मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर नमूद केले आहे. गंजवड बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल 2,500 ते 5,000 रुपयापर्यंत सरासरी बाजार भाव मिळाला.

कांदा बाजार भाव वाढीचे कारणे..

हे वाचा: NEW आजचे कापूस बाजार भाव 1 डिसेंबर 2023 Cotton rate

गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादनात घट झाली असून, बाजारामध्ये कांद्याची आवक सुद्धा कमी झाली आहे. यामुळे कांदा भावात तेजी पाहायला मिळत आहे.

कांदा भावात वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गेल्या काही दिवसापासून कवडीमोल भावात विकणाऱ्या कांद्याला एकदम एवढा चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कांदा घसरणीमुळे झालेले नुकसान आता कांदा तेजीत भरून निघण्याची शक्यता सुद्धा आहे.

हे वाचा: सोयाबीन बाजारभावात वाढ..! पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव Soyabean Rates

Leave a Comment