शेवटची संधी करा हे काम..! अन्यथा विसरा PM, CM किसान योजनेचे 12000 रू

शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असतात. ज्या योजना मधून शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत केली जाते.

अशातलीच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. या योजनेचे वर्षातून तीन हप्ते होतात प्रत्येकी हप्त्यात दोन दोन हजार रुपये दिले जातात.

हे वाचा: rain update: महाराष्ट्रात होणार या तारखांना अतिवृष्टी...! पंजाबराव डख लाईव्ह अंदाज

योजनेच्या हप्ता घेण्यासाठी आता सरकारने नवीन शर्ती व अटी लागू केल्या आहेत. पी एम किसान योजनेचा हप्ता उचलण्यासाठी आता शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे. 20 सप्टेंबर पर्यंत जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही. तर इ केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित केले जाईल.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेली नाही. या लाभार्थ्यांना आता 20 सप्टेंबर पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे.

पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी, आधार सीडीग, फिजिकल वेरिफिकेशन या अटी व शर्यती पूर्ण करणे आवश्यक आहे. या अटी व शर्यती पूर्ण नाही केल्यास लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे वाचा: महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात आज रात्री पडणार धो धो पाऊस

जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्माननिधी या योजनेसाठी पात्र केले जाणार आहे. त्यामुळे वरील अटी व शर्यती पूर्ण नाही केल्यास तुम्ही पी एम किसान योजना, आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेतून देखील अपात्र ठरतातल…

ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही. अशांनी लवकरात लवकर पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा आपले सरकार या ॲपद्वारे आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी. असे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

हे वाचा: राज्यातील या भागात आज मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Comment