panjab dakh: राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस..! पंजाबराव डख

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंडानंतर अखेर सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील विविध भागातील बळीराजा सुखावला आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा मोठे जीवनदान मिळाले आहे.

हे वाचा: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..! पहा नवीन अपडेट

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल नुकताच एक नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यांमध्ये 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये विविध ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे.

त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली होती. अशा शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीस आली आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीस झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन ऑक्टोबर महिन्याच्या पाच तारखेच्या अगोदर काढून घ्यावी. कारण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 5 ऑक्टोबर नंतर अतिवृष्टीचा इशारा आहे.

हे वाचा: पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..! पावसाबद्दल मोठा अंदाज

त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी अशी माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.

Leave a Comment