महाराष्ट्रात इथून पुढे असे राहणार हवामान…! अवकाळी पाऊस पडणार का..? पंजाबराव डख यांनी सांगितले स्पष्ट Panjab Dakh

Panjab Dakh: महाराष्ट्रात मागील दोन ते तीन दिवसापासून सतत गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मागील दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील विविध भागात आवकाळी पाऊस देखील पाहायला मिळाला आहे.

हा आवकाळी पाऊस राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात होता. या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे. काढण्यासाठी आलेले भात पीक पावसामुळे जागीच खराब झाली आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.

हे वाचा: राज्यात 16, 17, 18 ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

मान्सूनच्या अपेक्षेप्रमाणे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील खरीप हंगाम अयशस्वी ठरला. त्यातच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीकही वाया गेले. परंतु सध्याच्या स्थितीत दिलासा दायक बातमी समोर आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात हवामान सुकर राहणार आहे. तसेच, राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच, राज्यात गुलाबी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ हवामानतज्ञ पंजाब डख यांनीही पुढील 10 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, 25 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. राज्यात हवामान सुकरच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचा: पहा महाराष्ट्रातील इतक्या भागात अवकाळी पाऊस..! IMD weather forecast

शिवाय, पंजाबरावांनी सांगितले की या काळात राज्यात थंडीची तीव्रता वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पिकांना पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

एकूणच, हवामान विभाग आणि ज्येष्ठ हवामानतज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढेल. गेल्या दोन महिन्यांतील अस्तित्वात न आलेल्या गुलाबी थंडीला आता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पिकांचे संगोपन करावे.

हे वाचा: rain alert: या 23 जिल्ह्यात पुढील 24 तासात वाढणार पावसाचा जोर..! हवामान विभागाचा अलर्ट

Leave a Comment