24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh

Panjab Dakh: महाराष्ट्र राज्यात मागील बऱ्याच दिवसापासून कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील थंडीचा जोर देखील वाढू लागला आहे.

राज्यात दिवाळी झाल्यानंतर चांगलीच थंडीची चाहूल लागली आहे. विशेष बाब म्हणजे हवामान खात्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, येत्या काही दिवसात थंडीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

हे वाचा: पुढील 3 ते 4 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता..! heavy rain

त्याचबरोबर ही थंडी रब्बी हंगामातली असून याचा फायदा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

अशा परिस्थितीतच महाराष्ट्रात 24 नोव्हेंबर पासून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दक्षिण आणि मध्य भागात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.

वास्तविकरित्या पाहता पंजाबराव यांनी मागील अंदाज असे सांगितले होते की, 24 नोव्हेंबर पर्यंत कोरडे हवामान राहील. त्याचप्रमाणे नवीन दिलेले अंदाजात पंजाबराव डख म्हणत आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच भागात 25 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत पावसाला सुरुवात होणार आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील या भागात वाढणार आज पावसाचा जोर...! हवामान विभागाचे अपडेट

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान पाऊस हा महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात पडणार आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटसंह वादळी पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

हे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! येत्या दोन महिन्यात सोयाबीनला मिळणार एवढा भाव Soyabean market rate

 

हे वाचा: IMD: येत्या 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Leave a Comment