दुसऱ्या टप्प्यात या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा नुकसान भरपाई..! Pik Vima Yojana

Pik Vima Yojana: मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पिक विम्याची वाटप जोरदार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील तब्बल 965 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा केला आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील पिक विमा वाटप होणाऱ्या सर्व जिल्ह्याची यादी व शेतकऱ्यांची यादी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

हे वाचा: या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर..! या बाबींमध्ये मिळणार मोठी सूट; कृषिमंत्री धनंजय मुंडे Drought declared update

शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पूर्णपणे वाया गेली खताबियानांच्या पैशावर पाणी पडले यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला

ही सर्व परिस्थिती लक्षात घेताच महाराष्ट्र सरकार द्वारे रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली. आता या योजनेअंतर्गतच पात्र असणारया शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पिक विमा वाटप केला जात आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 965 कोटी रुपयांची पिक विमा रक्कम जमा करण्यात आली आहे. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळी अगोदरच पिक विमा रकमेचा लाभ मिळाला.

हे वाचा: या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पिक विमा; 1.25 कोटी शेतकरी पात्र Dushkal Nuksan Bharpai List

ज्या जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनी द्वारे कोणताही आक्षेप घेण्यात आल्या नव्हता अशा सर्व जिल्ह्यांमध्ये 25% पिक विमा वाटप करण्यात आला आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात पिक विमा वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधील जवळपास सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा भरला त्यानुसारच ज्या जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनी द्वारे कोणताही आक्षेप नव्हता अश्या सर्व जिल्ह्यात पिक विम्याची रक्कम वाटप करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात पिक विमा वाटप करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..! crop insurance

दुसऱ्या टप्प्यात खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याचा लाभ…

 

  • बीड
  • बुलढाणा
  • वाशीम
  • नंदुरबार
  • धुळे
  • नाशिक
  • पुणे
  • अमरावती
  • अहमदनगर

वरील दिलेल्या सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पिक विम्याचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment