पंजाबराव डख म्हणतात राज्यात अजून इतके दिवस पडणार पाऊस.

हवामान विभागाचे प्रसिद्ध हवामान अभ्यासात पंजाबराव डख ज्यांना अचूक हवामान अंदाजासाठी महाराष्ट्राच्या कानान कोपऱ्यात ओळखले जाते. अशातच त्यांनी पावसाविषयी नवीन अंदाज दिला आहे.

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात 9 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात नऊ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा हवामान होती.

हे वाचा: मोदी सरकार देणार या लोकांना मोफत गॅस सिलेंडर..! वाचा सविस्तर

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी त्यांच्या अंदाजात असे नमूद केले होते की संपूर्ण राज्यात फक्त नऊ सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल त्यानंतर फक्त कोकणातच चांगला पाऊस पडेल. परंतु हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 सप्टेंबर पर्यंत सर्वच भागात चांगला पाऊस पडेल.

पंजाबराव यांना विश्वास आहे की, राज्यात येत्या मंगळवार पर्यंत चांगला पाऊस पडेल. ज्यामुळे राज्यातील शेतकरी देखील सुखावतील व खरीप पिकांना पुन्हा जीवनदान मिळेल.

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना असा सुद्धा प्रश्न होता की, ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडेल की नाही. याचे उत्तर देताना पंजाबराव म्हणतात की ऑक्टोबर महिन्यात 5 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस सुरू होईल.

हे वाचा: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

यावर्षी जून महिन्यात सुद्धा पाहिजे तेवढा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत की, यावर्षी पिकांचे काय होणार पिकांना कुठून पाणी आणायचे. याचे उत्तर देताना सुद्धा पंजाबराव म्हणतात की सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये या पावसाचा सरासरी पाऊस तरी पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment