ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल पंजाबराव डख यांच‌ मोठ भाकीत..!

नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाचे आपल्याला हालच पाहायला मिळाले आहेत. जून महिन्यात येणारा मान्सून जुलै महिन्यात महाराष्ट्रात दाखल झाला. नंतर ऑगस्ट महिना पूर्ण पावसाविना गेला.

आता सप्टेंबर महिन्यात हळूहळू पावसाला सुरुवात होताना दिसत आहे. परंतु हा पाऊस किती दिवस असणार, ऑक्टोबर मध्ये काय परिस्थिती असणार रब्बी हंगाम व्यवस्थित होणार का, ऑक्टोबर महिन्यातील पाऊस राहणार का..?

हे वाचा: कांद्याला मिळतोय 6000 हजार रुपये प्रति क्विंटल भाव..! वाचा सविस्तर..

असे प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत आहे. यातच पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान, बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची संभावना आहे.

त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. एकंदरीत त्यांच्या अंदाजानुसार 12 सप्टेंबर पर्यंत चांगला पाऊस पडू शकतो. याच कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातही चांगला पाऊस पडू शकतो. असे मत पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे.

म्हणजे मंगळवार पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडेल. शेतकरी आनंदी झाला आहे.

हे वाचा: rain update: महाराष्ट्रात होणार या तारखांना अतिवृष्टी...! पंजाबराव डख लाईव्ह अंदाज

दरम्यान ऑक्टोबर महिन्यातही यावर्षी चांगला पाऊस होणार आहे अशी माहिती पंजाबराव यांनी दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यात पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात होईल.

तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच हवामान तज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, यावर्षी परतीचा पाऊस चांगलाच बरसणार आहे. पंजाब रावांनी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडेल असे म्हटले आहे.

त्यांनी पुन्हा एक व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुष्काळाची चिंता करू नये.

हे वाचा: विहीर शेततळे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान..! लवकर करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment