पंजाबराव डख यांचा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मोलाचा सल्ला; काय म्हणले डख वाचाच एकदा Rabi season

Punjab dakh महाराष्ट्र बरोबरच आता संपूर्ण देशात येत्या काही दिवसातच रब्बी हंगाम सुरू होणार आहे. सध्याच्या काळात खरीप हंगामातील सोयाबीन मका या पिकांची काढणी चालू आहे. तर बऱ्याच ठिकाणी काढलेला माल बाजारात विक्रीसाठी सुद्धा येत आहे.

याचाच अर्थ की, आता काही दिवसातच रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतिची मशागत करण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. अशा काळातच पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामा विषयी माहिती दिली आहे.

हे वाचा: panjab dakh: या तारखेपासून राज्यात मुसळधार पाऊस...! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

त्यांनी सांगितले आहे की हरभरा आणि गव्हाची केव्हा पेरणी केली पाहिजे. व लागवड केल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे. या विषयी माहिती पंजाबराव यांनी दिली.

पंजाबराव डख म्हणतात की, गहू आणि हरभरा पेरणी केव्हा करायची हे जर ओळखायचे असेल, तर स्टीलच्या भांड्यात खोबऱ्याचे तेल घ्या किती खोबऱ्याचे तेल स्टीलच्या भांड्यात टाकल्यानंतर घट्ट असेल तर अशावेळी गव्हाचे आणि हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

पेरणी करण्यासाठी काही हरकत नाही. म्हणजेच याचा असा अर्थ की जेव्हा थंडीची तीव्रता वाढते त्यावेळेस गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी करण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा नवीन अंदाज Heavy Rain Maharashtra

त्याचबरोबर पंजाबराव म्हणतात की, हरभऱ्याची पेरणी करण्याच्या अगोदर रोटर मारून घ्यावे. व त्यानंतर हरभऱ्याच्या उत्तम जातीची निवड करून 18 इंचावर किंवा 24 इंचावर पेरणी करावी.

त्याचबरोबर पंजाबराव म्हणतात की पेरणीच्या अगोदर एक बॅग खात्याची आणि दहा किलो गंधक बियाणांना लावावा. व हरभरा बियाणांची पेरणी खोल करावी म्हणजेच एकरी 40 ते 50 किलो हरभरा बी वापरावे. जेणेकरून हरभरा दाट होईल व त्याच्यापासून चांगला उतार मिळेल.

यासोबतच पंजाबराव म्हणतात की हरभरा पेरणी केलेल्या दिवशी जमिनीत ओलावा नसेल. तर जास्तीत जास्त दोन तास स्पिंकलर ने पाणी द्यायचे आहे. व पेरणीला वीस दिवस झाल्यानंतर दुसरे पाणी पाच तास द्यायचे आहे. त्याचबरोबर हरभरा पेरणीला 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर 7 तास पाणी द्यायचे आहे.

हे वाचा: येत्या 24 तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा मोठा अंदाज

Leave a Comment