rain update: राज्यातील या भागात आज मुसळधार पावसाचा अलर्ट

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यांमध्ये आज 23 सप्टेंबर दरम्यान विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडेसह पाऊस पडणार आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचा: राज्यातील या भागात आज रात्रीपासून अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज Unseasonal rain

झारखंड परिसरात असलेली कमी दाबाचे प्रणाली आता ओसरली असून, तथापि पश्चिम झारखंड आणि आसपासच्या परिसरात चक्रीय वारे वाहत आहे. व त्याचबरोबर या प्रणाली पासून नैऋत्य उत्तर प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सुद्धा निर्माण झाला आहे.

त्यामुळे आज राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण राहून पाऊस सुद्धा हजेरी लावणार आहे. पावसाच्या अनुकूल वातावरणामुळे आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, भंडारा, अकोला, अमरावती व उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट करण्यात आला आहे.

हे वाचा: 15 सप्टेंबर पासून राज्यातील या जिल्ह्यात भयंकर पाऊस..! हवामान अंदाज

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, व उत्तरं महाराष्ट्रातील जळगाव तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Monsoon Maharashtra

Leave a Comment