महाराष्ट्रातील या भागात आज होणार पावसाचे दणक्यात आगमन..!

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा वेग कमी झाला असून राज्यातील पावसाचे वातावरण सुद्धा निवळले आहे. राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची अजून सुद्धा शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा वेग जरी कमी झाला असला तरी अजून तो तेथेच असल्यामुळे राज्यामध्ये पुढील पाच दिवस विविध ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज..! संपूर्ण राज्यात ७ नोव्हेंबर पासुन मुसळधार पाऊस Panjab Dakh

अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग त्रिव असल्यामुळे पुढील 72 तासात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. ह्या हलक्या सरी महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात बरसतील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात गोवा आणि कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 22 सप्टेंबर पर्यंत पडेल अशी माहिती सुद्धा दिली आहे.

21 आणि 22 सप्टेंबरला राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस चांगलीच हजेरी लावेल अशी सुद्धा माहिती पुणे हवामान वेधशाळेने दिली आहे. 20,21,22 सप्टेंबरला विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचा: 24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो.

Leave a Comment