येत्या 48 तासात राज्यातील या भागात होणार पावसाला सुरुवात…! हवामान विभागाचा इशारा

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बरोबर मुंबई पाणी ठाण्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत असेही नमूद केले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशाच्या केंद्र भागावर आहे. इथे दोन ते तीन दिवसात तो गुजरात आणि राजस्थानच्या भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसाविषयी नवीन अंदाज; महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार की नाही थेटच सांगितलं panjab dakh

त्यामुळे देशभरात पुढील दोन आठवड्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह अनेक राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मराठवाड्यात सुद्धा येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. याचबरोबर विदर्भ कोकण आणि गोव्याच्या विविध भागात 16 आणि 17 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडेल.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये सध्या हवा सुद्धा सुटत आहे. याचबरोबर येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे वाचा: rain update: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..! माणिकराव खुळे

Leave a Comment